IRDAI-परवानाधारक सर्व्हेयर · कोल्हापूर

क्लेम कट होण्याआधी योग्य मार्गदर्शन घ्या.

वर्कशॉप मालक, वाहनमालक आणि व्यावसायिकांसाठी विमा क्लेम सल्ला. योग्य estimate, पूर्ण कागदपत्रे आणि सर्व्हेयरशी स्पष्ट संवाद, म्हणजे कमी कपात आणि वेगवान settlement.

  • मोटर · फायर · प्रॉपर्टी क्लेम
  • Estimate ते settlement
  • मराठी, हिंदी, English
  • 28वर्षांचा एकूण अनुभव
  • 10वर्षे सर्व्हेयर म्हणून
  • 1,000+मोटर क्लेम
  • 250+नॉन-मोटर क्लेम
  • 150+इन्व्हेस्टिगेशन्स
कोणासाठी

क्लेमच्या टेबलच्या दोन्ही बाजू माहीत असलेला सल्लागार

विमा कंपनी क्लेम कसा तपासते हे सर्व्हेयर म्हणून आतून पाहिलेले आहे. तोच अनुभव आता तुमच्या बाजूने.

वर्कशॉप / गॅरेज मालक

  • विमा कंपनीच्या पद्धतीने estimate
  • सर्व्हेयरच्या कपातीचे कारण समजून घ्या
  • अडकलेले cashless पेमेंट
  • स्टाफसाठी क्लेम प्रशिक्षण

वाहनमालक

  • अपघातानंतर पहिल्या दिवसापासून मार्गदर्शन
  • कमी रक्कम का मिळाली याचे स्पष्टीकरण
  • नाकारलेल्या क्लेमचा पुनर्विचार
  • चोरी आणि total loss क्लेम

दुकान, कारखाना, व्यावसायिक

  • आग, पूर, चोरी नुकसान क्लेम
  • स्टॉक व मशिनरी नुकसानाचे मोजमाप
  • आवश्यक कागदपत्रांची यादी
  • सर्व्हेयर भेटीची तयारी
सेवा

Estimate पासून settlement पर्यंत प्रत्येक टप्प्यावर मदत

S-01

Estimate तयार करणे व तपासणी

पार्ट्स, labour आणि painting विमा कंपनीच्या नियमांनुसार, म्हणजे नंतर वाद कमी.

S-02

क्लेम कागदपत्रे व फाइलिंग

Claim form, फोटो, RC, DL, FIR आणि बिलांची पूर्ण आणि क्रमवार फाइल.

S-03

सर्व्हे दरम्यान मार्गदर्शन

सर्व्हेयरसमोर नुकसान कसे मांडायचे आणि काय टाळायचे.

S-04

कपात व डेप्रिसिएशन विश्लेषण

Assessment मधील प्रत्येक कपात तपासून, अयोग्य कपातीवर लेखी मुद्दे.

S-05

नाकारलेले / कमी settle झालेले क्लेम

Grievance, पुनर्विचार अर्ज आणि Insurance Ombudsman पर्यंतचा मार्ग.

S-06

Cashless व insurer tie-up

वर्कशॉपसाठी empanelment ची तयारी, documentation आणि payment follow-up.

S-07

वर्कशॉप स्टाफ प्रशिक्षण

Service advisor आणि estimator साठी व्यावहारिक क्लेम प्रशिक्षण.

S-08

फायर व प्रॉपर्टी क्लेम

दुकान, गोदाम, कारखाना नुकसानाचे मोजमाप आणि क्लेम मांडणी.

वर्कशॉप मालकांसाठी

गाडी दुरुस्त झाली, पण पैसा अजून अडकलाय?

बहुतेक वर्कशॉपचे नुकसान दुरुस्तीत नाही, तर कागदावर होते. या अडचणी ओळखीच्या वाटतात का?

  • #1
    Labour आणि painting कमी मंजूर झालेEstimate मधील दर insurer च्या schedule शी जुळत नाहीत.
  • #2
    Replace ऐवजी repair सांगितलेनुकसानाचे फोटो आणि कारणमीमांसा पुरेशी नव्हती.
  • #3
    Final bill आणि approval मध्ये फरकSupplementary estimate वेळेवर गेला नाही.
  • #4
    Cashless पेमेंट महिनोंमहिने बाकीअपूर्ण कागदपत्रे किंवा query चे उत्तर राहिले.

प्रति-क्लेम सल्ला

एका केससाठी

एका अडलेल्या क्लेमचे estimate, कागदपत्रे आणि कपात तपासून पुढची पावले.

वर्कशॉप पार्टनर प्लॅन

मासिक

दर महिन्याच्या सर्व क्लेमसाठी estimate audit, फोटो-कागदपत्र checklist आणि payment follow-up.

स्टाफ ट्रेनिंग वर्कशॉप

अर्धा / पूर्ण दिवस

तुमच्या service advisor आणि estimator साठी प्रत्यक्ष उदाहरणांसह प्रशिक्षण.

सामान्य चुका

क्लेम का कापला जातो?

बहुतेक कपात टाळता येते, फक्त वेळेवर योग्य पाऊल उचलायला हवे.

कारणकाय करावे
✕विमा कंपनीला उशिरा सूचना✓अपघातानंतर लगेच insurer ला कळवा आणि claim number घ्या.
✕सर्व्हेआधी दुरुस्ती सुरू केली✓सर्व्हे आणि मंजुरी होईपर्यंत गाडी उघडू नका; आधी फोटो घ्या.
✕जुने नुकसान estimate मध्ये मिसळले✓फक्त या घटनेचे नुकसान, स्पष्ट फोटोसह मांडा.
✕अपूर्ण कागदपत्रे✓Policy, RC, DL, फोटो, estimate आणि गरज असल्यास FIR एकत्र ठेवा.
✕डेप्रिसिएशनची माहिती नसणे✓खालील कॅल्क्युलेटरने आधीच अंदाज घ्या आणि ग्राहकाला सांगा.
✕Policy अटींचे उल्लंघन✓वैध licence, वाहनाचा योग्य वापर आणि add-on कव्हर आधीच तपासा.
मोफत साधन

मोटर क्लेम कपात कॅल्क्युलेटर

India Motor Tariff च्या डेप्रिसिएशन दरांवर आधारित अंदाज. तुमचे estimate भरा आणि विमा कंपनी साधारण किती देईल ते पाहा.

वाहनाची माहिती

बॉडी पॅनल, दरवाजा, बोनेट
बंपर, टायर, ट्यूब, बॅटरी · 50%
30% डेप्रिसिएशन
विंडशील्ड, काचा · 0%
साहित्य 25% धरून त्यावर 50%
डेप्रिसिएशन नाही
विमा कंपनीकडून अंदाजे रक्कम₹32,375
विमा कंपनीडेप्रिसिएशनDeductible
  • एकूण estimate₹45,000
  • धातू डेप्रिसिएशन− ₹4,500
  • प्लास्टिक/रबर डेप्रिसिएशन− ₹6,000
  • फायबरग्लास डेप्रिसिएशन− ₹0
  • पेंट साहित्य डेप्रिसिएशन− ₹1,125
  • अनिवार्य deductible− ₹1,000
  • ग्राहक / वर्कशॉपचा वाटा₹12,625

हा फक्त अंदाज आहे. Salvage, consumables, policy deductible, GST आणि सर्व्हेयरचे मूल्यांकन यामुळे अंतिम रक्कम बदलू शकते. 5 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी insurer वेगळे मूल्यांकन करू शकते.

डेप्रिसिएशन दर पाहा (धातूचे पार्ट्स)
6 महिन्यांपर्यंत0%
6 महिने ते 1 वर्ष5%
1 ते 2 वर्षे10%
2 ते 3 वर्षे15%
3 ते 4 वर्षे25%
4 ते 5 वर्षे35%
5 ते 10 वर्षे40%
10 वर्षांपेक्षा जास्त50%
प्रक्रिया

चार सोप्या टप्प्यांत काम

  1. संपर्क व माहिती

    WhatsApp वर policy, फोटो आणि estimate पाठवा.

  2. केस तपासणी

    Policy अटी, नुकसान आणि कागदपत्रांचा आढावा; फी आधीच स्पष्ट.

  3. फाइल तयार

    Estimate, claim form आणि पुराव्यांची व्यवस्थित फाइल.

  4. Settlement पर्यंत पाठपुरावा

    सर्व्हेयर व insurer च्या query ला उत्तर, payment होईपर्यंत.

Prashant Jadhav, IRDAI licensed surveyor and loss assessor

Prashant Jadhav

  • परवानाIRDAI Surveyor & Loss Assessor
  • SLA क्रमांकIRDA/IND/SLA-120383
  • विभागमोटर · फायर · मिस्क.
  • प्रोफाइलprashantjadhav.com
  • LinkedInprashantanadraojadhav
ClaimWale मागे कोण

सर्व्हेयरच्या नजरेतून तुमचा क्लेम

ClaimWale ची सुरुवात Prashant Jadhav यांनी केली आहे. ते IRDAI-परवानाधारक सर्व्हेयर आणि लॉस असेसर आहेत. त्यांना 28 वर्षांचा अनुभव आहे, त्यातील 10 वर्षे सर्व्हेयर म्हणून. विमा कंपनी कोणता पुरावा मागते, कपात कुठे होते आणि फाइल का अडते, हे त्यांनी रोजच्या कामात पाहिले आहे.

हाच अनुभव वर्कशॉप मालक आणि विमाधारकांना सोप्या भाषेत, नियमांच्या चौकटीत राहून दिला जातो.

पारदर्शकतेचे वचन: ज्या क्लेमचा सर्व्हे आम्ही विमा कंपनीसाठी करतो, त्या क्लेममध्ये आम्ही विमाधारकाला सल्ला देत नाही.

प्रश्नोत्तरे

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

ClaimWale ही विमा कंपनी किंवा एजंट आहे का?

नाही. आम्ही पॉलिसी विकत नाही. आम्ही क्लेमसाठी स्वतंत्र सल्ला आणि मार्गदर्शन देतो.

क्लेम पूर्ण मंजूर होईल याची हमी देता का?

नाही. अंतिम निर्णय विमा कंपनीचा असतो. आम्ही तुमचा क्लेम योग्य कागदपत्रे आणि नियमांच्या आधारे मजबूतपणे मांडायला मदत करतो.

Zero Dep असेल तर पूर्ण रक्कम मिळते का?

पार्ट्सवरील डेप्रिसिएशन कापले जात नाही, पण अनिवार्य deductible, consumables (add-on नसल्यास) आणि salvage ची कपात राहू शकते.

कोणती कागदपत्रे लागतात?

Policy, RC, ड्रायव्हिंग लायसन्स, नुकसानाचे फोटो, वर्कशॉप estimate आणि चोरी, थर्ड पार्टी किंवा मोठ्या अपघातात FIR.

फी किती आहे?

फी केसच्या प्रकारावर आणि कामाच्या व्याप्तीवर ठरते. काम सुरू करण्याआधी ती स्पष्ट सांगितली जाते.

तुम्ही कोणत्या भागात सेवा देता?

प्रत्यक्ष भेट आणि सेवा कोल्हापूर, कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटक भागात. फोन, WhatsApp आणि video call द्वारे सल्ला इतर ठिकाणीही घेता येतो.

संपर्क

तुमचा क्लेम कुठे अडलाय ते सांगा

फॉर्म भरा, संदेश थेट WhatsApp वर तयार होईल. फोटो आणि estimate तिथेच जोडा.

फोन / WhatsApp+91 98500 54528 ईमेलcontact@claimwale.in
सेवा क्षेत्रकोल्हापूर, कोकण, गोवा व उत्तर कर्नाटक
WhatsApp वर पाठवा माहिती फक्त तुमच्या क्लेमसाठी वापरली जाते.